माजी क्रिकेटपटू अरुण लाल आणि बुलबुल साह विवाहबंधनात अडकले आहेत. अरुण लाल आणि बुलबुल यांच्या वयामध्ये 28 वर्षांच अंतर आहे. त्यामुळे त्यांच्या विवाहाची चर्चा फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही होत आहे.
दोघे सोमवारी कोलकाता येथे खासगी समारंभात विवाहबद्ध झाले. त्यानंतर रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती.
अरुण लाल आणि बुलबुल यांनी विवाहसोहळ्या दरम्यान पत्रकारांशीही चर्चा केली. दोघांना त्यांच्या हनीमूनबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अरुण लाल यांनी रणजी करंडक स्पर्धाच आमचा हनीमून असल्याचं उत्तर दिलं.
रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये बंगालचा सामना झारखंड विरुद्ध होणार आहे. 4 ते 8 जून दरम्यान ही मॅच खेळवली जाईल.
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. यावेळी बुलबुल बंगालच्या संघाला चियर करताना दिसणार आहे.
अरुण लाल बंगाल क्रिकेट टीमचे हेड कोच आहेत. "मी वास्तवात खूप खूश आहे. माझ्याकडे आयुष्यात पुन्हा एकदा संधी आहे. मी बुलबुलवर मनापासून प्रेम करतो. आम्ही दोघं आयुष्यभर चांगलं जोडप बनून राहू" असं अरुण लाल म्हणाले.
भारतासाठी सलामीवीर राहिलेल्या अरुण लाल यांनी दुसऱ्यांदा सात फेरे घेतले आहेत. पहिली पत्नी रीनापासून त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
रीना यांची तब्येत खूप खराब असते. रीना यांच्या मर्जीनेच अरुण लाल यांनी दुसरं लग्न केलं आहे. विवाहसोहळ्या दरम्यान अरुण लाल आणि बुलबुल यांनी केक कापला व लग्नवाचं रजिस्ट्रेशन केलं.
अनेक पाहुणे या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. हॉटेल पीयरलेस मध्ये सोमवारी रात्री रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. बीसीसाआय अध्यक्ष सौरव गांगुली सुद्धा या लग्नाला आला होता. सोशल मीडियावर या जोडप्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
बुलबुल साहा एका शाळेत शिक्षिका आहे. बुलबुलला जेवण बनवायला भरपूर आवडतं. तिने 2019 मध्ये एका कुकिंग स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. अरुण लाल भारतासाठी 16 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 6 अर्धशतकरांसह 729 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये एका अर्धशतकासह 122 धावा केल्या आहेत.