आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा 13 मेला साखरपुडा पार पडला.
राघव चड्ढा आणि परिणिती चोप्राच्या साखरपुड्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत राघव आणि परिणिती यांना शुभेच्छा दिल्या. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, असं अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अरविंद केजरीवाल यांच्या कालच्या ट्विटला राघव चड्ढा यांनी आज उत्तर दिलं आहे. सर आपण आमच्या साखरपुड्याला उपस्थित राहून कार्यक्रम खास केला. त्यासाठी आपले आभार, असं राघव चड्ढा म्हणाले आहेत.
परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. या दोघांचे फोटो शेअर करत अनेकांना या जोडप्याला आशिर्वाद दिलेत.