Marathi News Photo gallery As soon as Uddhav Thackeray resigned as the Chief Minister, actresses Sherlyn Chopra and Kangana gave 'Ya' reaction
Udhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच अभिनेत्री शर्लिन चोप्रा व कंगनाने दिल्या ‘या’ प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या . यामध्ये अनेक अराजकीय तसेच सेलिब्रेटींनीही आपली मते व्यक्त केली आहेत.
1 / 10
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाईव्हवर राज्याला संबोधित करताना आपल्या मुख्यमंत्री पदाचा व विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा पदाचा राजीनामा दिला.
2 / 10
आज गुरुवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट घेण्याच्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलेल्या निर्देशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय फ्लोर टेस्टच्या एक दिवस अगोदरच आपला राजीनामा दिला.
3 / 10
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यानंतर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या . यामध्ये अनेक अराजकीय तसेच सेलिब्रेटींनीही आपली मते व्यक्त केली आहेत.
4 / 10
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने सोशल मीडियावर ठाकरेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. तिने ट्विटकरत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
5 / 10
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शर्लिन चोप्राने तिच्या ट्विटरवरून. ''उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला #UddhavOut'' आणि फॉलो-अप ट्विटमध्ये ''FINALLY!!'' असे लिहिले आहे
6 / 10
त्यानंतर फॅशन डिझायनर फराह खान अली हिनेंहि आपल्या ट्विटरवर ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचाराजीनामा दिल्यानंतर त्यावर ट्विट करत भाष्य केलं आहे
7 / 10
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की उद्धव ठाकरे भलेही आज तुमची ताकद हारली असेल. मात्र तुम्ही लाखो हृदये जिंकली आहेत. त्यांची किंमत कोणत्याही पैश्यात होऊ शकत नाहीत.
8 / 10
यानंतर वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावतनेही उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर इन्स्ट्राग्रामवर व्हिडीओ पोस्टकरत भाष्य केलं आहे.
9 / 10
कंगनाने आपल्या व्हडिओमध्ये म्हटले आहे की १९७५नंतर ही वेळ भारतीय लोकशाहीसाठीची ही सर्वात महत्त्वपूर्ण वेळ आहे. १९७५मध्ये लोकनेता जेपी
नारायण यांनी दिलेल्या एका हाकेनंतर सिंहासन सोडा असे म्हटले होते . त्यानंतर २०२०मध्ये मी म्हटले होते की लोकातंत्र एका विश्वास आहे. व सत्तेच्या अहंकारात येऊन जो कोणी हा विश्वास तोडतो त्यांचाही विश्वास तुटतो.
10 / 10
हनुमानाला शिवाचा बारावा अवतार मानले जाते. आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चाळीस बॅन करते. तेव्हा त्यांना साक्षात शिवही माफ करणार नाही हरहर महादेव , जय हिंद , जय महाराष्ट्र