ऑस्ट्रेलियाचा आक्रमक खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच बाप होणार आहे. मॅक्सीची पत्नी विनू रमन हिचे बेबी शॉवरचे फोटो समोर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्य ती पारंपारिक हिंदू वेशभूषेमध्ये दिसली. नेटकऱ्यांनी दोघांंचं अभिनंदन केलं आहे.
१८ मार्च २०२२ साली ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता. दोघे आता लवकरच आई-बाबा होणार आहेत.
मॅक्सीची पत्नी विनी रमन हिचे तामिळ पद्धतीने सेलिब्रेट केलेले फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दिसत आहे की तिने, निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
विनीने आपल्या बेबी शॉवरचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मॅक्सीने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे.
विनी रमन भारतीय वंशाची तामिळनाडूमधील आहे. दोघांनी २०२० साली साखरपुडा केला होता तर २०१९ साली त्यांची ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघांची भेट झाली होती.