भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी लिहिलेल्या अयोध्या या पुस्तकाचे दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात प्रकाशन झाले. या पुस्तकाचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार, भाजप नेते मंगलप्रभात लोढा आदी नेते या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी पुस्तकाविषयी आपले मत मांडले.
या पुस्तकात कुठलेही राजकीय भाष्य नाही. हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून वापरले जाईल यात शंका नाही, असे फडणवीस म्हणाले.
यापुढील काळात भारताची ओळख अयोध्येतील राम मंदिरावरून होणार आहे. या पार्श्वभूमीवर माधव भांडारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून नवीन माहिती वाचनास मिळेल, असे दरेकर यांनी ट्विट करत पुस्तकाबद्दल आपले मत व्यक्त केले.
या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपचे अनेक नेते, तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.