या भारतीय खेळाडूचं करिअर संपलं ? मोठ्या बॅननंतर पुनरागमन करणं मुश्किल

कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. राजकारणात एंट्री झाल्यावर त्याच्या खेळाबाबात आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. आता त्याच्यावर बॅन लावण्यात आल्याने परिस्थिती कठीण बनली आहे. काय आहे प्रकरण ?

| Updated on: Nov 27, 2024 | 12:43 PM
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल ॲन्टी डोपिंग एजन्सीने (NADA) त्याला 4 वर्षांसाठी सस्पेंड केलं आहे. आधी राजकारणात प्रवेश आणि आता NADAच्या कारवाईनंतर या भारतीय कुस्तीपटूची कारकीर्द जवळपास संपल्याचे मानले जात आहे. (Photos : Instagram))

1 / 5
राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता ॲन्टी डोपिंग टेस्टसाठी सॅम्पल देण्यास नकार दिल्यानंतर 30 वर्षांच्या बजरंग पुनियावर ही कारवाई करण्यात आली आहे.

2 / 5
मात्र NADAने बजरंगला बॅन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी 23 एप्रिल रोजी देखील बजरंग पुनियाला निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने प्रोव्हिजनल सस्पेन्शनविरोधात देखील अपील केलं होतं. तेव्हा नाडाच्या डोपिंग पॅनलच्या शिस्तपालन समितीनं 31 में रोजी त्याचं निलंबन रद्द केलं होतं. NADA ने 23 जून रोजी बजरंगला नोटीस पाठवली होती. बजरंगने या आरोपाला 11 जुलै रोजी लेखी युक्तिवादात आव्हान दिले होते, ज्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली.

3 / 5
अनुशासनात्मक डोपिंग पॅनेलच्या सांगण्यानुसार,  खेळाडू हा कलम 10.3.1 अंतर्गत 4 वर्षांच्या निलंबनास जबाबदार आहे. या निलंबनाचा अर्थ असा की बजरंगला कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. याशिवाय, अनेक सवलतींना मुकावं लागेल. तसंच तो परदेशातही कोचिंगच्या नोकरीसाठी अर्ज करू शकणार नाही. पॅनेलने नमूद केल्यानुसार, बजरंगच्या निलंबनाचा हा कालावधी 23 एप्रिल 2024 पासून लागू आहे.

4 / 5
यापूर्वी बजरंगने त्याची बाजू मांडली होती. त्याच्या सांगण्यानुसार, त्याने कधीच थेटपणे नमूने देण्यास नकार दिला नव्हता. पण या टेस्टसाठी मुदत संपलेले कीट अर्थात एक्सपायरड कीट का वापरण्यात येत आहे, याचा खुलासा NADA नं करावा, असा प्रश्न त्याने विचारला होता. मात्र बजरंगनं जाणूनबुजून सँपले देण्यास नकार दिला. त्यामुळे ही बंदीची कारवाई करण्यात आल्याचं  NADAनं म्हटलं होतं.

5 / 5
Follow us
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.