शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) 95 वी जयंती आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे किस्से, त्यांच्या खास आठवणी, पक्षीय राजकारणापलीकडची नाती, साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती यांच्यावर असलेलं बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचे राजकीय निर्णय, त्यांचं व्यापक हिंदुत्व, त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेलं त्यांचं विशेष प्रेम या आठवणींवर आज प्रकाश टाकण्यात येतोय.
बाळासाहेबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की शिवसेनेतीलच नाही तर विरोधी पक्षातील बडे नेतेही त्यांचं कौतुक करायचे. बाळासाहेब संपूर्ण आयुष्यभर महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढत राहिले. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या अशाच काही स्मृतींना उजाळा देऊ. पाहा बाळासाहेबांच्या आयुष्यातील कधीही न पाहिलेले फोटो...
पाहा आणखी फोटो...