फिरकीपटू राशिद खान धावा देण्याच्या बाबतीत फार चिवट आहे. गोलंदाजी करताना तो फार धावा देत नाही. मात्र बीग बॅश लीग स्पर्धेत त्याने चक्क 4 चेंडूत 22 धावा लुटल्या. यासह त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला.
बीबीएल स्पर्धेत आज 13 डिसेंबरला होबार्ट हरिकेंस आणि एडिलेड स्ट्रायकर्स यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात डार्सी शॉर्टने राशिदच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली.
राशिद सामन्याची 14 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमध्ये डार्सीने दुसऱ्या तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर सिक्सर खेचला. तसेच चौकारही लगावला. यासह राशिद बीबीएलमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला.
डार्सीने या ओव्हरमध्येच अर्धशतक पूर्ण केलं. डार्सीच्या अर्धशतकाच्या जोरावर होबार्टने एडिलेडला विजयासाठी 175 धावांचे आव्हान दिले. मात्र एडिलेडला 163 धावाच करता आल्या. यामुळे एडिलेडचा पराभव झाला.