Shreyas Iyer | मनात संशय असेल, विश्वास नसेल, तर श्रेयस अय्यर परत तिथे का जाईल?
Shreyas Iyer | मिडिल ऑर्डरचा फलंदाज श्रेयस अय्यर मागच्यावर्षी BCCI च्या कॉन्ट्रॅक्टमध्ये B ग्रेडचा भाग होता. यावर्षी सुद्धा त्याला याच ग्रेडमध्ये ठेवलं जाईल, अशी अपेक्षा होती. पण रणजी ट्रॉफी न खेळण्याची त्याला शिक्षा मिळाली. पण BCCI च्या या निर्णयाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतायत.
-
-
BCCI ने या वर्षासाठीच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्ट्सची घोषणा केलीय, तेव्हापासून वादाला सुरुवात झालीय. शिक्षा म्हणून श्रेयस अय्यर आणि इशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रेक्ट्सच्या बाहेर ठेवण योग्य आहे का? हा प्रश्न विचारला जातोय.
-
-
दोघेही रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळले नाहीत, म्हणून त्यांचा कॉन्ट्रेक्ट् लिस्टमध्ये समावेश केला नाही. श्रेयस अय्यर बरोबर जास्त चुकीच तर झालं नाही ना? म्हणून वादविवाद सुरु आहेत.
-
-
श्रेयस अय्यरला मागच्यावर्षी कॉन्ट्रॅक्टमध्ये बी ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यासाठी त्याला 3 कोटी रुपये मिळणार होते. यावर्षी कॉन्ट्रेक्टची यादी समोर आली, त्यात श्रेयस अय्यरच नाव नव्हतं. त्यांच्याशिवाय इशान किशन आणि युजवेंद्र चहल सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा सुद्धा समावेश केला नाही.
-
-
अय्यर आणि इशान दोघांना BCCI कडून वारंवार रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास सांगितलं जात होतं. पण त्यांनी ऐकल नाही. त्याची शिक्षा मिळाली. पण खरच श्रेयस अय्यर बरोबर काही चुकीच झालय का?
-
-
भारत-इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरु होण्याआधी श्रेयस आपला घरचा संघ मुंबईकडून रणजी सामना खेळला होता. इंग्लंड विरुद्ध 2 टेस्ट मॅचनंतर अय्यरला टीममधून ड्रॉप करण्यात आलं. इथूनच सर्व कन्फ्यूजन सुरु झालं.
-
-
अय्यरला पाठदुखीमुळे टीममधून ड्रॉप करण्यात आलं. मागच्यावर्षीच त्यावर उपचार झाले होते. अय्यर आधीच एक रणजी सामना खेळला असेल, तर त्याला कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर करण्यावर प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे.
-
-
दुखापतीमुळे श्रेयसने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांमधून आपल नाव मागे घेतलं. याच दुखापतीमुळे तो मुंबईकडून काही रणजी सामने खेळला नाही. NCA ने BCCI ला एक रिपोर्ट पाठवला होता. त्यात अय्यरला फिट घोषित केलं होतं. आता प्रश्न हा निर्माण होतो की, अय्यर स्वत:च्या फिटनेसबद्दल खोट बोलला की, NCA च्या रिपोर्टमध्ये गडबड आहे.
-
-
BCCI च्या नियमानुसार, कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली की, NCA मध्ये जाव लागत. तिथे खेळाडू NCA मेडीकल टीमच्या देखरेखीखाली असतो. मागच्या काही काळात NCA च्या प्रतिमेला तडा गेलाय. त्यांच्या निर्णयांमुळे टीम इंडिया अडचणीत आलीय.
-
-
स्वत: श्रेयस अय्यरला याचा फटका बसलाय. जानेवारी 2023 मध्ये अय्यर पाठदुखीमुळे बाहेर गेला होता. त्याला पुनरागमनासाठी बराच वेळ लागला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर NCA ने त्याला फिट घोषित केलं होतं.
-
-
दोन कसोटी खेळल्यानंतर चौथ्या सामन्यावेळी पुन्हा दुखापतीने उचल खाल्ली. त्यानंतर तो जवळपास 5 महिने बाहेर होता. श्रेयस अय्यरच नाही जसप्रीत बुमराहच्या बाबतीत सुद्धा NCA कडून असच झालय. खेळाडूंचा NCA वरुन विश्वास उडालाय का? हा प्रश्न आता निर्माण होतोय.