फोनचा अधिक वापर - आजकाल लोकांचा मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. कामाचे फोन, मेल करणे, गेम खेळणे इथपासून ते ऑनलाइन शॉपिंग करण्यापर्यंत सर्व कामं फोनवर होतात, त्यामुळे दिवसातला बराचसा वेळ मोबाईलवरच जातो. काही लोकांना तर त्याची इतकी सवय असते की ते रात्रंदिवस मोबाईलवर असतात. यामुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो. खरंतर या गॅजेट्समधून निघणाऱ्या ब्लू लाइटमुळे झोप वाढवणाऱ्या मेलाटॉनिन या हार्मोनच्या पातळीचे नुकसान होते आणि यामुळेच बऱ्याच जणांना रात्री लवकर झोप येत नाही.