बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींपैकी एक आहे. एक मोठा काळ हा कतरिना कैफ हिने बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कतरिना कैफ हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
कतरिना कैफ हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बूम चित्रपटाने केली. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासारखे मोठे स्टार होते. या चित्रपटात अत्यंत बोल्ड लूकमध्ये कतरिना कैफ दिसत होती.
यानंतर महेश भट्ट यांनी त्यांच्या साया चित्रपटासाठी कतरिना कैफ हिला कास्ट केले. मात्र, बूम चित्रपट रिलीज झाल्यानंतर लोकांना फार काही कतरिना कैफ हिचा अभिनय आवडला नाही.
बऱ्याच लोकांनी यानंतर कतरिना कैफ हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली. अचानक महेश भट्ट यांनी एका रात्रीमध्ये कतरिना कैफ हिला त्यांच्या साया चित्रपटातून बाहेर काढले.
विशेष म्हणजे त्यावेळी कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. यानंतर कधीच कतरिना कैफ हिने महेश भट्ट यांच्या चित्रपटामध्ये काम केले नाही.