मुबंईसह उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण क्षेत्रात दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणी पातळी १४१ मि.वाढली आहे.
त्यामुळे पाणी पातळी समतोल राखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून आज शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते धरणाचे जलपूजन करुन ५ पैकी ३ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.
भातसा धरणात पाणी समतोल राखण्यासाठी १, ३, आणि ५ या गेट o.25 सेमी पर्यत उघडून २९०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गांवाना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.