भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री मोनालिसा आज तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनालिसानं भोजपुरी व्यतिरिक्त हिंदी, बंगाली आणि तेलगू चित्रपटांमध्येसुद्धा काम केलं आहे.
मोनालिसानं चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून चाहत्यांचं मन जिंकलं आहे.
खरंतर या अभिनेत्रीचं नाव मोनालिसा नसून तिचं खरं नाव 'अंतरा विश्वास' आहे.
मोनालिसाचा जन्म एका बंगाली कुटुंबात झाला. वयाच्या 16 व्या वर्षीच तिनं एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली.
सुरुवातीला तिनं लो बजेट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र हळूहळू तिनं स्वत:ची ओळख प्रस्तापित केली.
आतापर्यंत 125 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये मोनालिसानं काम केलं आहे.
अभिनेत्री मोनालिसा तिच्या हॉट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती भोजपुरी चित्रपटांमधील एक टॉप अभिनेत्री आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त ती 'बिग बॉस 10' मध्ये सुद्धा झळकली. याच शोमध्ये तिचं लग्न बॉयफ्रेंड विक्रांत सिंहसोबत झालं.