77 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत ' At work.. KBC from 9 am to 9 pm .. and after that here at recording ..' असं कॅप्शन दिलं आहे. सोबतच 'कष्ट केल्याशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही... वडील नेहमी म्हणायचे.. जीवन आहे तोपर्यंत संघर्ष आहे' असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता वय सरलं असतानाही अमिताभ तब्बल 12 तास काम करत आहेत. तरुणांसाठी हे नक्कीच प्रेरणा देणारं ठरतंय.