आयफोन 14 घेण्याचं अनेकांचं स्वप्न आहे. पण बजेट नसल्याने अनेक जण डिस्काउंटच्या शोधात असतात. तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात घेण्याची संधी आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही 15 रुपये वाचवू शकता. (Photo - Apple)
अॅपलने आयफोन 14 चं 128 जीबी व्हेरियंट 79,900 रुपयांना लाँच केलं होतं. मात्र आता हा फोन 68,999 रुपयांना मिळत आहे. (Photo - Apple)
फ्लिपकार्टवरून आयफोन 14 घेतल्यास एक चांगली ऑफर मिळत आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डने ईएमआय ट्रान्सक्शन केल्यास थेट 4 हजार रुपयाचं डिस्काउंट मिळेल. (Photo - Apple)
आयफोन 14 (128 जीबी) व्हेरियंट लाँच किंमतीपेक्षा 11 हजारांना स्वस्त लिस्ट केला आहे. त्यामुळे बँकेचे 4 हजार आणि 11 हजार असं डिस्काउंट पकडला 15 हजारांची बचत होईल. म्हणजेच 79,900 रुपयांचा फोन थेट 64,999 रुपयांना मिळेल.(Photo - Apple)
आयफोन 14 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना ओलेड डिस्प्ले आहे. त्याचबरोबर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी ए15 बायोनिक प्रोसेसर दिला आहे. मागच्या बाजूला 12 एमपी वाइड सेंसर आणि 12 एमपी अल्ट्रा वाइड अँगल सेंसर दिला आहे. (Photo - Apple)