
बिग बॉस फेम , गायक मिलिंद गाबा नुकताच गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्नबंधनात अडकला आहे. प्रिया आणि मिलिंद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मागील काही दिवसांपासून हा लग्न समारंभ सुरू होता. या भव्य विवाहसोहळाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर प्रसिद्ध गायक मिलिंद गाबाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्न केले आहे.

मिलिंग गाबा आणि प्रिया बेनिवाल यांच्या भव्य विवाह सोहळ्याचे एक असे बढकर एक फोटो समोर आले आहेत . हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.

या लग्नाच्या फोटोंमध्ये नवरदेव मिलिंद आणि नवरी प्रिया यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

इंस्टाग्रामवर मिलिंद आणि प्रियाने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची घोषणा केली होती, तेव्हापासून या जोडीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.