'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा पहिलाच दिवस त्यांच्यासाठी अनेक आव्हानांचा ठरणार आहे. 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांचा 100 दिवसांचा प्रवास सुरू झाला असून आता पहिल्या दिवसापासूनच शोमध्ये ट्विस्ट पहायला मिळणार आहे.
घरातील स्पर्धकांना अगदी पहिल्याच दिवसापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या स्पर्धकांचा पहिल्या दिवशी ब्रेकफास्टचा लॅव्हिश थाट असला तरी हा ब्रेकफास्ट नक्की कोणाच्या नशिबात असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावा लागेल.
'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या एपिसोडचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणतोय "गार्डन एरियामध्ये आपल्यासाठी एक लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केला आहे".
'बिग बॉस'ने लॅव्हिश ब्रेकफास्ट आयोजित केल्याची घोषणा करताच स्पर्धकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. घरातील सदस्यांसाठी 'बिग बॉस'ने गार्डन एरियामध्ये लॅव्हिश ब्रेकफास्टची मेजवानी ठेवलेली असते.
छोटा पुढारीला काही दिसत नसल्याने अरबाज त्याला उचलून सर्वकाही दाखवतो. त्यावेळी वर्षा उसगांवकर त्याला विचारतात की, काय दिसलं? त्यावर अरबाज म्हणतो, 'स्वर्ग'. त्यानंतर घराबाहेरच्या दोन अनोळखी व्यक्तींची घरात एण्ट्री होते.
काहीही न बोलता हे अनोळखे व्यक्ती त्यांच्याकडे असलेला एक पेपर घरातील सदस्यांना दाखवतात. त्यावर 'Do NOT TOUCH' (स्पर्श करू नका) असं लिहिलेलं असतं.