दुचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या हिरो मोटोकॉर्पकडून आपल्या ग्राहकांसाठी रोडसाइड असिस्टेन्स (आरएसए) हा नवीन उपक्रम सुरु केला आहे.
तुमची बाईक रस्त्यात बंद पडल्यास तुम्ही रोडसाइड असिस्टेन्स (आरएसए) या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याअंतर्गत ग्राहकांना ऑनकॉल सर्विस, ऑनस्पॉट रिपेअर किंवा नजीकच्या हिरो मोटोकॉर्प वर्कशॉपपर्यंत बाईक पोहोचवण्यासाठी मदत मिळेल.
प्रवास करताना तुमच्या गाडीतील पेट्रोल संपले तरी रोडसाइड असिस्टेन्स (आरएसए) या सुविधेची मदत घेता येऊ शकते.
टोल फ्री नंबर किंवा हीरो कस्मटर अॅपच्या माध्यमातून तुम्ही रोडसाइड असिस्टेन्स (आरएसए) ही सुविधा सबस्क्राईब करु शकता.
या सुविधेसाठी ग्राहकांना वर्षाला ३५० रुपयांचे शुल्क भरावे लागेल. तर एक्सट्रीम 160आर, एक्सट्रीम 200एस और एक्सपल्स 200 या बाईक्ससाठी ही सुविधा एक वर्षापर्यंत मोफत असेल.