मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची मुलगी जेनिफरचा साखरपुडा पार पडला आहे. बॉयफ्रेन्ड नायल नस्सारशी तिनं साखरपुडा केला आहे.
गेल्या चार वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.
बिल आणि मेलिंडा गेट्स यांची मोठी मुलगी जेनिफरनं इनस्टाग्रामवर नायलसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिनं नायलसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे.
या पोस्टमधून तिनं नायलविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
शिवाय नायलनंही त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत, 'ती हो म्हणाली आहे, त्यामुळे जगातला सगळ्यात सुखी मनुष्य असल्यासारखं मला वाटतंय. तू माझ्यासाठी सर्वकाही आहे.' असं कॅप्शन त्यानं दिलं आहे.