Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बासूने ‘डोहाळे जेवणाचे’ शेअर केले खास फोटो ; बंगाली रीतीरिवाजानुसार पार पडला समारंभ

| Updated on: Sep 09, 2022 | 12:51 PM

बिपाशाने तिच्या आईसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले, मला तुझ्यासारखी आई व्हायचे आहे. तुझ्यावर प्रेम आहे ,आई यासोबतच बिपाशाने एक छोटी व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. ज्यामध्ये ती रस्समनुसार जेवण करताना दिसत आहे.

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू सध्या तिच्या गरोदर पणाचा आनंद घेत आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर पती करण सिंग ग्रोवरसोबत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे.  त्यानंतर अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिचे पारंपरिक बंगाली पद्धतीनं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.  हा सोहळा अभिनेत्रीच्या घरी आयोजित करण्यात आला होता. याचे खास  फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
बिपाशा बसूने तिच्या बेबी शॉवर फंक्शनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाची  बनारसी नेसलेली दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने सोन्याचे दागिने घातले आहेत.  या पारंपरिक लूकमध्ये बिपाशा बसू खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील गरोदरपणाची चमक तिला आणखीनच आकर्षक बनवत आहे.

3 / 5
काही फोटोंमध्ये बिपाशा   तिच्या आईसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले - मला तुझ्यासारखी आई व्हायचे आहे. तुझ्यावर प्रेम आहे आई यासोबतच बिपाशाने एक छोटी व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे ज्यामध्ये ती रस्समनुसार जेवण करताना दिसत आहे.

4 / 5
या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील काही फोटोंमध्ये बिपाशा पती करणसोबत दिसत आहे. दोघेही खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.

5 / 5
बिपाशाच्या फोटोंवर चाहतेही भरभरून  प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. एका सोशल मीडिया युझरने लिहिले आहे की   तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.  दुसऱ्या एकाने लिहिले आहे,   खूप सुंदर! देव तुला, करण आणि तुझ्या मुलाला आशीर्वाद देवो. बाकीचे चाहतेही अशाच प्रकारे प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.