Birthday Special Photos: फिल्मी दुनियेपासून दूर असलेल्या मल्लिका शेरावतच्या आयुष्यातील वादग्रस्त प्रसंग
मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा आहे. मल्लिका तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीसोबतच तिच्याशी संबंधित वादांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
Follow us
सध्या फिल्मी दुनियेपासून दूर असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतचा आज 44 वा जन्मदिन आहे. मल्लिकाचा जन्म 24 ऑक्टोबर 1976 रोजी रोहतकमध्ये झाला होता. बॉलिवुडमध्ये तिने ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटापासून करिअरला सुरुवात केली.
मल्लिकाचं खरं नाव रीमा लांबा आहे. मल्लिका तिच्या बोल्ड आणि ब्यूटीफुल पर्सनॅलिटीसोबतच तिच्याशी संबंधित वादांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
मल्लिका शेरावत बिजनेसमॅन सायरिल ऑक्जेनफेंसला डेट करत होती. 2017 मध्ये आलेल्या बातम्यांनुसार मल्लिका आणि तिच्या फ्रेंच बॉयफ्रेंडला पॅरिसमधील एका अपार्टमेंटमधून घराचं भाडं न भरल्याने थेट हकलून दिलं होतं.
मल्लिका शेरावतने ख्वाहिश चित्रपटात एकूण 17 किसिंग सीन केले होते. तसेच या चित्रपटात ती हिरोसाठी कंडोम खरेदी करत असतानाही दाखवलं आहे. यावेळी त्यांनी भारतातील प्रत्येक मुलीने असं केलं तर भारताची लोकसंख्या इतकी वाढली नसती असं वक्तव्यंही केलं. त्यानंतर जोरदार वाद झाला होता.
मल्लिका शेरावतने 2015 मध्ये आलेल्या पॉलिटिक्स चित्रपटात शरीराला तिरंगा गुंडाळलेला दिसला. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या चित्रपटात मल्लिका ओमपुरींसोबत दिसली होती.
मल्लिका शेरावतने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. भारत अप्रगतिशील देश आहे. भारताचे लोक कोणत्याही महिलेची प्रगती पाहू शकत नाही. मी महिलांची स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न केले, तर मलाच वाईट ठरवण्यात आलं, असं विधान मल्लिकाने केलं होतं. यानंतर मल्लिका जोरदार ट्रोल झाली होती.