लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांनी मतदान केल्याचा फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केलाय
तसेच लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्या कुटुंबासह नागपूरच्या टाऊन हॉटमध्ये मतदान केलं आहे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नागपुरातील मतदान केंद्रावर मतदान केले
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील त्यांच्या कुटुंबासह चंद्रपूरमधील वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे लक्ष्य पुढे ठेवून मतदानाचा हक्क बजावला आहे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नागपुरात आज मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, मतदान करणे हा आपला केवळ अधिकारच नाही तर ते आपले राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे.