कारचालकाचे प्रसंगावधान, भाजप नेते बंडारु दत्तात्रेय बालंबाल बचावले
बंडारु दत्तात्रेय यांच्या कार चालकाने प्रसंगावधान राखत स्टिअरिंग जाम झालेल्या गाडीवर नियंत्रण मिळवले
Follow us
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रेय कार अपघातातून बालंबाल बचावले. दत्तात्रेय यांच्या गाडीला तेलंगणात भीषण अपघात झाला.
तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील खैतापुरममध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंडारु दत्तात्रेय निघाले होते. या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला जाणार होता.
बंडारु दत्तात्रेय यांच्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडीत घुसली. गाडीचे स्टिअरिंग जाम झाल्याचा दावा ड्रायव्हरने केला.
कार चालकाने कुशलतेने गाडीचा वेग कमी करुन झुडपांमध्ये घुसवली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
भाजपचे दिग्गज नेते बंडारु दत्तात्रेय हे सिकंदराबादचे माजी लोकसभा खासदार आहेत. 73 वर्षीय बंडारुंकडे सध्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची धुरा आहे.