Photos | बिहारमधील विजयानंतर भाजपची दिल्ली मुख्यालयात धन्यवाद रॅली
बिहारमध्ये एनडीएनं विजय मिळवल्यामुळे दिल्लीतल्या भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.
Follow us
बिहारमध्ये एनडीएनं विजय मिळवल्यामुळे दिल्लीतल्या भाजप मुख्यालयाबाहेर जोरदार जल्लोष करण्यात आला आहे. बिहारमधील विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
बिहारमधील यशाचं भाजप कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन केलं जात आहे. यासाठी विजय रॅली काढण्यात आली.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी उपस्थित होते. या रॅलीमध्येही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
जेपी नड्डांचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी फुलं देऊन स्वागत केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं.
यावेळी जे. पी. नड्डा यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी निवडणुकीतील यशाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं.
या सभेला मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भाजप मुख्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानतानाच विरोधकांवर सडकून टीका केली.
मोदींच्या भाषणावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या.
मोदींनी आपल्या भाषेत काँग्रेसवर घराणेशाहीचाही आरोप केला.
मोदी भाषण करत असताना तेथे उपस्थित भाजप कार्यकर्त्यांमध्ये हे भाषण रेकॉर्ड करण्याची चढाओढ लागली होती.