बाॅलिवूड अभिनेता इमरान खान याने मोठा खुलासा केलाय. अभिनेत्याच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेत्याने हैराण करणारे खुलासे केले आहेत.
अभिनेता म्हणाला की, एका स्टुडियोच्या पार्किंगमध्ये मी तब्बल तीन आठवडे जेवण केले. मी ज्यावेळी स्टुडियोमध्ये बसून नाॅन व्हेज खात होतो, त्यावेळी त्यांनी मला मनाई केली.
त्यानंतर मला सवयच झाली आणि मी पार्किंगमध्ये बसून जेवण करत होतो. मात्र, चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांची माझ्याकडे पाहण्याची नजरच बदलली.
ज्या लोकांनी मला जेवणासाठी पार्किंगमध्ये बसण्यास सांगितले ते लोक मला सर सर करून बोलत होते. अचानक लोकांचे प्रेम आणि सन्मान वाढला.
इमरान खानचा 'जाने तू या जाने न' हा चित्रपट हिट ठरला. यानंतर अभिनेत्याला अनेक चित्रपटांच्या आॅफर देखील एका मागून एक येताना दिसल्या.