बॉलिवूडची टॉप अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्सचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही लोक करिनाला स्टाईल आयकॉन म्हणून फॉलोही करतात. अलीकडेच करिनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिक्विन साडी परिधान केली होती. या पीच कलरच्या साडीत बेबो खूपच ग्लॅमरस दिसत होती, त्याबरोबर तिने सॅटिन ब्लाऊज परिधान केला होता.
प्रियंका चोप्रा तिच्या फॅशन ट्रेंड्समुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रसिद्ध आहे. लोकांना तिच्या अभिनयासह फॅशन ट्रेंडदेखील प्रचंड आवडतो. एका रेड कार्पेट सोहळ्याला प्रियांकाने शिमारी साडी परिधान केली होती, यात ती खूपच सुंदर दिसत होती. प्रियंकाने आयव्हरी रंगाच्या साडीसह कॉर्सेट ब्लाऊज परिधान केले होते. ही साडी अबू जैन आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती.
अभिनेत्री अनुष्का शर्माचे लग्नातील कपडे खूपच चर्चिले गेले होते. लग्नाच्या रिसेप्शनसाठी अनुष्काने खास ग्रीन मिंट रंगाची साडी परिधान केली होती. अनुष्काची ही साडी खूपच हलकी होती, ज्यावर पितळ आणि झरीचे नक्षीकाम केले गेले होते. अनुष्काने तिच्या लूकसह मॅचिंग इयररिंग्ज आणि चोकर घातले होते.
अभिनेत्री कियारा अडवाणी कोणत्याही भारतीय किंवा वेस्टर्न लूकमध्ये नेहमीच खूप सुंदर दिसते. एका फोटोशूट दरम्यान, कियाराने लेव्हेंडर आणि गुलाबी डाई सिक्वेन्स असणारी साडी परिधान केली होती. साडीसह मॅचिंग नोडल स्ट्रॅप ब्लाऊज घातला होता. कियाराने तिच्या या लूकला साजेसा हिऱ्यांचा नेकपीस अॅक्सेसराइझ केला होता.
परिणीती चोप्राने गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त काळ्या रंगाची साडी परिधान केली होती. परिणीती या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यासाडीसह तिने नेडलाइन ब्लाऊज परिधान केला होता. या फेस्टिव्ह लूकला साजेसे सिल्व्हर झुमके तिने घातले होते.