पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात एका शेतकऱ्याला आपल्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
टणू गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दत्तात्रय मोहिते यांच्या जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यामध्ये ही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली.
त्यानंतर शेतकऱ्याने पोलिसांना ही माहिती दिली. इंदापूर पोलीस आणि बॉम्ब शोध व नाश पथक बीडीडी पथक या ठिकाणी दाखल झाले आहे.
दाखल झालेल्या या श्वान पथकाने ती वस्तु डिटेक्ट केली आहे.
इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ, पोलिसांचा तपास सुरू…