मलायका अरोराच्या चाहत्यांमध्ये आजही भर होताना दिसते. कारण मलायका स्वत:च्या वर्कआउट वरती विशेष लक्ष ठेऊन असते. तसेच ती नेहमी तिच्या खाण्याकडे अधिक लक्ष ठेऊन असते. त्यामुळे ती कित्येक वर्षांपासून एकसारखीच दिसत आहे. ती आता 48 व्या वयात आहे. परंतु तिने स्वत:ला इतकं फीट ठेवलं आहे की, ती आजही 24 ते 25 वर्षाच्या मुलीसारखी दिसते. मलायका रोज जीम वर्कआऊट आणि योगा करत असते.
मध्यंतरी तिने एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने तिला खायला काय आवडतं. तसंच रोज काय खाणं गरजेच आहे. यावर ती स्पष्टपणे बोलत होती.
सुरूवातीच्या काळात मलायका हलक्या गरम पाण्यासोबत लिंबू पाणी घेत होती.नाश्त्यासाठी हिरवी स्मूदी असायची, त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार साध जेवण, भाजी, रोटी, आणि भात. तसेच मलायकाला जेवताना लोणचे लागते.
सायंकाळच्या जेवणात मलायकाला मच्छी खायला अधिक आवडते. त्याच्यासोबत तीला सालाड खायला देखीलअधिक आवडतं. तसेच जेवण झाल्यानंतर गोड बेसनाचे लाडू आणि डार्क चॉकलेट सुध्दा अधिक आवडते. मलायका म्हणते की जेवणासाठी अधिक भाज्या घरी आणते. तसेच डेअरीच्या पदार्थापासून अत्यंत दूर असते.
मलायकाला सगळ्यात जास्त खायला मासे आवडतात, तर ती मासे स्वत:ही बनवते तसेच आईने बनविलेले मासे मलायकाला अधिक आवडतात असं तिने सांगितलं.
मलायकाने खूप कमी वयात तिच्या आईला किचनमध्ये मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येक डिश नाव मलायकाला माहित आहे. साऊथ इंडियन खाणं तिला अधिक आवडतं.