12 एप्रिल 2004 रोजी वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराने इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत 400 धावांचा विक्रम नोंदविला होता. कसोटी क्रिकेटमध्ये लाराने त्याच्या नावावर बरेच मोठे विक्रम नोंदवले आहेत, परंतु हा विक्रम त्यापैकी सर्वात विशेष आहे.
वेस्ट इंडीजने 202 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 751 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला त्यांचा डाव 285 धावांवर संपला. इंग्लंडकडून अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफने 102 आणि मार्क बुचरने 52 धावा केल्या. वेस्ट इंडीजने पुन्हा इंग्लंडला फलंदाजी दिली पण इंग्लडचा संघ दुसऱ्या डावात बाद झाला नाही. अशा प्रकारे हा सामना अनिर्णित राहिला.