अनेक लोक डार्क सर्कलच्या समस्येने त्रस्त असतात. दीर्घकाळ स्क्रीन पाहणे, तणाव, झोप न लागणे आणि इतर अनेक कारणांमुळे डार्क सर्कल्स येतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे घरगुती उपाय करून पाहू शकता.
काकडी - काकडीचे तुकडे करून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर हे काप डोळ्यांवर किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर ते काढून टाका. याने डोळ्यांना आराम मिळेल. नियमित वापराने फरक दिसून येईल.
गुलाब पाणी - गुलाबपाणी टोनर म्हणून सर्रास वापरले जाते. एक कापसाचा गोळा गुलाब पाण्यात भिजवून डार्क सर्कल्स असलेल्या भागावर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते काढून टाका.
कोल्ड टी बॅग्ज - ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फ्रीजमध्ये 30 मिनिटे ठेवा. यानंतर या बॅग्ज डोळ्यांवर 10 ते 15 मिनिटे ठेवा व नंतर काढून टाका. नियमित वापराने फरक पडेल.
गार दूध - दूध हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्रोत आहे. दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि डार्क सर्कल्स असलेल्य भागावर ठेवा. ते किमान 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर काढून टाका.