
बॉलीवूड ब्यूटी सारा अली खानने 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये रेड कार्पेटवर देसी लूकमध्ये प्रवेश केला. मोठ-मोठे गाऊन आणि जड दागिन्यांनी सजलेल्या इतर सौंदर्यवतींच्या तुलनेत साराच्या लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo : Instagram)

सारा अली खानने कान्समध्ये पदार्पण केले असून ती अनोख्या अंदाजात रेड कार्पेटवर दिसली. साराने अबू जानी-संदीप खोसला यांनी बनवलेला लेहंगा परिधान केला होता. केसांची खास हेअरस्टाइल करून तिने हा लूक पूर्ण केला.

कान्सच्या रेड कार्पेटवर साराची लांबलचक ओढणी फडकत होती. यावेळी साराने मिनिमल मेकअप लूक केला होता आणि तिच्या पोशाखाकडे सर्वांचे लक्ष वेधले. तिने या लेहंग्यासोबत स्टेटमेंट ड्रॉप इअररिंग्ज घातल्या होत्या.

सध्या सारा तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात विकी कौशल सारासोबत दिसणार आहे.

याशिवाय सारा अली खानकडे अनेक चित्रपट आहेत. ज्यामध्ये 'ए वतन मेरे वतन' आणि अनुराग बसूचा 'मेट्रो इन डिनो' सारखे चित्रपट आहेत.