एकनापि सुवृक्षेन पुष्पितें सुवासिक । वसित तद्वनम् सर्वं सुपुत्रेण कुळ तथा । चाणक्याने तिसर्या अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात लिहिले आहे की, ज्याप्रमाणे सुगंधी फुलांनी भरलेले एक झाड संपूर्ण वन सुगंधाने भरून टाकते, त्याचप्रमाणे पुत्रामुळे संपूर्ण वंश सुशोभित होतो.
काहींना अनेक संतान असतात. पण त्यांच्या संख्येमुळे कुटुंबाचा मान वाढत नाही. कुटुंबाचा मान वाढवण्यासाठी एक सद्गुणी मुलगा पुरेसा आहे. धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांपैकी एकही सुसंस्कृत निघाला नाही. अशा शंभर पुत्रांचा काय उपयोग?
तिसर्या अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात चाणक्य लिहितात की, ज्याप्रमाणे एका सुकलेल्या झाडाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण जंगल जळून राख होते, त्याचप्रमाणे एक मूर्ख आणि दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. ज्याप्रमाणे जंगलातील सुकलेल्या झाडाला आग लागते आणि संपूर्ण जंगल जळून जाते, त्याचप्रमाणे कुटुंबात वाईट मुलगा जन्माला आला तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो. कुळाची प्रतिष्ठा, मानसन्मान वगैरे सर्व धुळीला मिळते. कौरवांचा नाश करणाऱ्या दुर्योधनाचे उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. लंकेचा अधिपती रावणही यातच मोडतो.
आचार्य चाणक्यांचा असा सल्ला होता की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात दान केले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काहीही दान करू शकता. धार्मिक दृष्ट्या भूमी दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान आणि गाय दान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते, पण आचार्य चाणक्यांनी यापेक्षा आणखी काही दान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.