विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवदर्शनाने आपल्या महत्त्वाच्या दिवसाची सुरुवात केली
चंद्रकांत पाटील सपत्नीक पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेले होते. निकालासाठी चंद्रकांतदादांनी बाप्पाची मनोभावे पूजा केली
चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे असून महाआघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे.
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर पाटील मुंबईत दाखल झाले असून निकालाची प्रतीक्षा आहे