Marathi News Photo gallery China beijing airport beijing daxing chinas huge new starfish airport opens its doors
PHOTO : स्टारफिशच्या आकाराप्रमाणे दिसणारे जगातील सर्वात मोठे विमानतळ
Daxing International Airport असे या नव्या विमानतळाचे नाव आहे. या विमानतळासाठी 11 अब्ज डॉलर म्हणजे 78 हजार 12 कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
Follow us
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी बुधवारी 25 सप्टेंबर यांनी चीनमधील नवीन विमानतळचे उद्धघाटन केले आहे.
या विमानतळासाठी 11 अब्ज डॉलर म्हणजे 78 हजार 12 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. हे नवे विमानतळ 100 फुटबॉलच्या मैदानाबरोबर आहे.
Daxing International Airport असे या नव्या विमानतळाचे नाव आहे.
चीनमधील हे विमानतळ बीजिंग शहरात आहे. बीबीसी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते या विमानतळाचे उद्धाटन करण्यात आले आहे. हे विमानतळ दिसायला अगदी स्टारफिशप्रमाणे दिसते.
हे विमानतळ 700,000 वर्ग मीटर क्षेत्रफळावर वसलेले आहे. यामध्ये जगभरातील सर्वात मोठे टर्मिनल आहे.
अटलांटानंतर जगभरातील सर्वाधिक व्यस्त एअरपोर्टमध्ये बीजिंगच्या या एअरपोर्टचा समावेश आहे असे विमानतळातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
या विमानतळावर चीन साऊर्दन एअरलाईन्स आणि चीन इर्स्टन एअरलाईन्स याने स्थानिक वेळेनुसार 3 वाजून 45 मिनिटांनी उड्डाण केले.
हे नवे विमानतळ प्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ जहा हदीद यांनी डिझाईन केले आहे.