सौंदर्य, अभिनय आणि उत्तम नृत्यकला यासाठी ओळखली जाणारी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.
तिनं आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
सोनाली सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे.
'Date भेट' या चित्रपटासाठी सोनाली सध्या लंडनमध्ये आहे. तिच्यासोबत अभिनेता हेमंत ढोमे झळकणार आहे.
तिचा हा आगामी चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक लोकेश गुप्ते दिग्दर्शित करत आहे.