अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच ट्रेंडप्रमाणे तिची लाईफस्टाईल मेंटेंन करते, तर सध्या सर्वत्र ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे त्यामुळे सोनालीनंसुद्धा मस्त फोटोशूट केलं आहे.
ख्रिसमस म्हटलं की लाल आणि पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं जातं, ख्रिसमसची ती थीमच असते. त्यामुळे सोनालीनं मस्त लाल रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोनाली या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. 'Because it is #Christmas ??????' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
सध्या सोनाली 'डान्सिंग क्विन' या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका साकारतेय. आता येत्या 27 डिसेंबरला या 'डान्सिंग क्विन'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यासाठी सोनालीनं हे खास फोटोशूट केलं आहे.
या लाल रंगाच्या गाऊनमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखीच फुलून दिसत आहे.