मुंबईसह देशभरात 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह खुली केली जाणार आहेत. सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चित्रपटगृह सुरु होणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चित्रपटगृह खुली करण्यासाठी विशेष तयारी केली जात आहे. सॅनिटायजेशनपासून ते सोशल डिस्टन्सिंगपर्यंत सर्व नियमांचे पालन व्हावे, यासाठी चित्रपटगृह मालकांनी कंबर कसली आहे.
चित्रपटगृहातील प्रत्येक कोपऱ्यात निर्जंतुकीकरण केले जात आहे.
चित्रपटगृहात कोणीही शेजारी-शेजारी बसू शकत नाही. दोन प्रेक्षकांच्यामध्ये एक सीट रिकामी ठेवली जाणार आहे.
चित्रपट पाहताना प्रेक्षकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
चित्रपटगृहांमध्ये केवळ डबाबंद खाद्यपदार्थ आणि पेय नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहाच्या काऊंटरवरुन कोणताही पदार्थ खरेदी केला तरी तो पूर्णपणे बंद डब्यातून दिला जाईल.
चित्रपटगृहातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क, बुट आणि पीपीई किट देण्यात आले आहेत.