PHOTO | ‘आशिकी’ चित्रपटातून घराघरांत पोहोचली, एक अपघाताने रातोरात बदललं अनु अग्रवालचं आयुष्य!

‘आशिकी’ चित्रपटानंतर अनु अग्रवालचा मोठा कार अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की, तब्बल 29 दिवस अभिनेत्री कोमात होती.

| Updated on: May 21, 2021 | 1:27 PM
प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न आहे की, आपण बॉलिवूड विश्वात आपले नाव कमवावे. पण काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांची स्वप्ने सत्यात उतरताच त्यांना या उद्योगाला निरोप द्यावा लागला. आज आपण अशाच एका अभिनेत्रीची कहाणी जाणून घेणार आहोत. 1990मध्ये ‘आशिकी’ (Aashiqui) या चित्रपटातून अभिनेत्री अनु अग्रवाल (actress Anu Agarwal) खूप चर्चेत आली. या चित्रपटाने अनुला रातोरात स्टारडम दिले. अनु अग्रवालने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती.

1 / 6
अनु अग्रवाल यांच्या अभिनयाची इंडस्ट्रीमध्ये चांगलीच प्रशंसा झाली. मात्र, या अभिनेत्रीला काही दिवसांतच अभिनयाला निरोप द्यावा लागला आणि तिने योगाला तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनवला. ‘आशिकी’ चित्रपटानंतर अनु अग्रवालचा मोठा कार अपघात झाला. ही अपघात इतका मोठा होता की, तब्बल 29 दिवस अभिनेत्री कोमात होती.

2 / 6
अनु अग्रवालने तिच्या कारकिर्दीत केवळ दोन चित्रपटांत काम केले आहे, तिचा पहिला चित्रपट होता ‘आशिकी’ आणि 1993 मध्ये आलेल्या दुसर्‍या चित्रपटाचे नाव होते खलनायिका. 1999 मध्ये झालेल्या एका अपघातानंतर तिच्या शरीराला अर्धांगवायू झाला. त्यानंतर तिने कधीही इंडस्ट्रीकडे वळून पाहिले नाही.

3 / 6
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, "माझा 1999मध्ये मोठा अपघात झाला होता, या अपघातानंतर मी कोमामध्ये गेलो. मी अपघातापूर्वी आश्रमात राहत होते, जिथे मी जीवनाच्या अध्यात्माकडे लक्ष देत होते. अपघातानंतर काय घडले हे मला आठवत नाही. पण मला माझं नाव आठवलं. 2001च्या सुमारास, मी या प्रपंचातून निवृत्त झाले आणि माझे केस देखील मुंडण केले. त्यानंतर मी शांत ठिकाणी ध्यान करणे सुरू केले."

4 / 6
या खास मुलाखतीत बोलताना अनुने सांगितले होते की, 2006 साली तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रवेश करण्याबद्दल विचार केला होता, ती बर्‍याच लोकांशी बोलू लागली आणि त्यांना भेटायला देखील गेली. पण त्या काळात लोकांनी तिला साथ दिली नाही. उलट लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्या अपघातानंतर तिला लिपस्टिक कशी वापरायची, हेदेखील माहित नव्हते. लोकांनी तिचे आधीचे आणि नंतरचे फोटो खूप शेअर केले. तिचा नो-मेकअप चेहरासुद्धा सर्वत्र दिसला. हेच कारण होते जेव्हा तिने हे सर्व पाहिले, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने पुन्हा त्या मार्गापासून स्वतःला दूर केले.

5 / 6
अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये ही अभिनेत्री दिसली होती. जिथे ती तिच्या ‘आशिकी’ या चित्रपटाच्या स्टारकास्टसह आली होती. सध्या अनु अग्रवाल बिहारमधील मुंगेरमधील मुलांना योगा शिकवते. जिथे ती लहान मुलांसोबत खूप आनंदी आहे.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.