बिग बी अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन बॉलिवूड स्टार आहे. पण आता राजकारणात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Source: Abhishek Instagram)
अभिषेक बच्चन यांचा एक फोटो अखिलेश यादव सोबत व्हायरल झाला होता. त्यामुळे समाजवादी पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. (Source: Akhilesh Yadav/Facebook)
आता अभिषेक बच्चन याने याबाबत खुलासा केला आहे. या सर्व अफवा असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. अशा बातम्या कुठून येतात कळत नाही असंही तो पुढे म्हणाला आहे. (Source: Abhishek Instagram)
अभिषेक बच्चन याने एका इंटरव्यूमध्ये सांगितलं की, "मला पॉलिटिक्सचा पी पण माहिती नाही. मी एक अभिनेता आहे आणि त्यात खूश आहे" (Source: Abhishek Instagram)
अभिषेक बच्चनची आई जया बच्चन समाजवादी पार्टीची नेता आहे. 2004 साली खासदार होती. तर अमिताभ बच्चन यांनीही राजकारणात नशिब आजमावलं आहे. (Source: Abhishek Instagram)
अभिषेक बच्चन याच्याबाबत 2013 मध्येही अफवा उडाली होती. तेव्हाही अभिषेकने या बातम्यांचं खंडन केलं होतं. (Source: Abhishek Instagram)