‘देवमाणसा’ची फसवणूक; लग्न ठरल्यानंतर किरण गायकवाडसोबत घडली ही गोष्ट, अडकला नैराश्याच्या गर्तेत
Actor Kiran Gaikwad on his marriage : अभिनेता किरण गायकवाड याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचा अभिनयही लोकांना आवडतो. एका मुलाखतीदरम्यान किरणने त्याचा अनुभव शेअर केला आहे. लग्न ठरल्यानंतर त्याला एका वेगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. वाचा सविस्तर...
1 / 5
'लागीर झालं जी', 'देवमाणूस' मालिकांमधून घरघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड... किरण त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. किरण गायकवाडने एका मुलाखतीदरम्यान त्याचा अनुभव शेअर केला.
2 / 5
किरणचं अरेंज मॅरेज ठरलं होतं. मात्र त्यानंतर त्याला एका त्रासदायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. माझं लग्न ठरलं होतं. सहा महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. दोन- तीनदा भेटलो. अचानक मला एक मेसेज आला, असं किरण म्हणाला.
3 / 5
माझ्यासोबत डबल डेटिंग झालं. त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले. चौक सिनेमाच्या शुटिंगवेळी हे सगळं झालं. मध्यंतरी मी त्यासाठी गोळ्या पण खात होतो. त्यात मला फार त्रास झाला, असं किरण गायकवाडने म्हटलं आहे.
4 / 5
मी सगळं ठरवलं होतं की हे माझं घर असेल. इथं आमच्या दोघांचा फोटो असेल, असं सगळं मी ठरवंल होतं. सहा महिन्यांचं आमचं रिलेशन होतं. डिप्रेशन काय असतं हे मी त्या काळात अनुभवलं आहे, असं किरणने सांगितलं.
5 / 5
'लागीर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांमध्ये किरण गायकवाडने काम केलं आहे. त्याच्या भूमिका प्रेक्षकांना आवडतात. त्याचा रांगडा अभिनयही प्रेक्षकांना भावतो. चौक आणि त्यानंतर डंका हे त्याचे सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.