पावसाळ्यात खोलीचा पुरेपूर वापर कसा करावा? खळखळून हसायला लावणारी कुशल बद्रिकेची पोस्ट

Actor Kushal Badrike Post About Rainy Seasion : अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. आताही त्याने एक हटके पोस्ट शेअर केलीय. पावसाळ्यात खोलीचा पुरेपूर वापर कसा करावा? याबाबत त्याने पोस्ट शेअर केलीय. पाहा...

| Updated on: Jul 21, 2024 | 1:10 PM
पावसाळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न असतो म्हणजे कपडे कसे वाळवावेत...? दोन-दोन दिवस कपडे वाळत नाहीत... यावर अभिनेता कुशल बद्रिके याने एक भन्नाट उपाय सांगितला आहे. कुशलने एक खास पोस्ट शेअर केलीय, जी वाचून तुम्ही खळखळून हसाल....

1 / 5
कुशल बद्रिकेने घरातील एका खोलीत कपडे वाळत घातलेत... त्याचे फोटो कुशलने शेअर केलेत. या फोटोंचं कॅप्शन प्रचंड खास आहे. आपलं स्वतःचं घर झालं की त्यातली एक खोली आपण “कलेसाठी” समर्पित करायची, जिथे “कलेची” जोपासना झाली पाहिजे. हे आमच्या दोघांचंही स्वप्न होतं. आणि आज एका छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या बायकोने मला पटवून दिलं की पावसाळ्यात कपडे वाळवणं ही सुद्धा एक “कलाच” आहे, असं कुशलने म्हटलं आहे.

2 / 5
आम्ही प्रेमाने घेतलेल्या घराच्या “खोलीचा” पुरेपूर वापर झाल्याचं समाधान माझ्या चेहऱ्यावर आहे. अजूनही माझ्या प्रेमात किती “खोली” आहे हे मी हिला दाखवलं असतं.... पण जाऊदे.. पावसाळा आहे आणि वॉशिंग मशीनला कपड्यांचा एक लॉट अजून लावलेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पावसाळ्यात अन्न, वस्त्र, नि वारा होऊन बसतात. असा नवीन शोध आज मला लागला, असं कुशलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

3 / 5
तळटीप- आमच्या त्या छोट्याश्या डिस्कशन नंतर माझ्या असं लक्षात आलंय की कथ्थक नाचणाऱ्या मुलींचा पाया आणि पाय दोन्ही खूप strong असतात. आता माझी कंबर बरी आहे काळजी नसावी - सुकून, अशी पोस्ट कुशलने शेअर केलीय.

4 / 5
 कुशलच्या पोस्टवर अभिनेता अभिजित खांडकेकर याने नात्यातला ओलावा ह्यामुळेच टिकून रहातो बघ, अशी कमेंट केलीय. दादा, जपून शेवटच्या फोटोमध्ये पाय कपड्यावर पडलेला दिसत आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. बरं ते डोक्यावर टोपी सुकवायची आयडिया छान आहे..., अशीही एका नेटकऱ्याने कमेंट केलीय.

5 / 5
Follow us
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.