सुपरस्टार प्रभास (Prabhas) याची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. प्रभास लवकरच ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभासबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधा कृष्ण कुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा एक रोमँटिक चित्रपट असणार आहे. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. प्रभासने आतापर्यंत अनेक रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना अधिक आवडते.