सनी देओल याने बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा केलाआहे. 2001 साली गदर चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हा बॉलिवूडमध्ये नेमकं काय सुरु याबाबत सांगितलं.
सनी देओल गदर 2 मध्ये पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्माही आहे.
गदर 2 चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील 1971 मधील युद्धाचा संदर्भ घेत कथा फुलवण्यात आली आहे. द कपिल शर्मा शो याबाबत सनी देओलने खुलासा केला आहे.
"गदर चित्रपटाच्या रिलीजवेळी बॉलिवूडने पाठ फिरवली होती.पण प्रेक्षकांच्या प्रेमामुळे सर्वकाही बदलून गेलं.", असं सनी देओल याने सांगितलं.
"गदर एक प्रेम कथा चित्रपट रिलीज झाला तेव्हा हीट होईल असं वाटलं नव्हतं. लोकं सांगायचे ही पंजाबी चित्रपट आहे. हिंदीत डब करा. काही वितरकांनी आम्हाला चित्रपट घेण्यास नकार दिला होता."
लोकांनी चित्रपटावर प्रेम केलं आणि सर्वांची तोंडं बंद केली. त्यामुळेच आम्हाला पार्ट 2 बनवण्याची हिम्मत मिळाली.
गदर 2 चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे.