बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीची लव्ह लाईफ खूप चर्चेत राहिली. अनुष्का आणि विराट कोहली या दोघांची पहिली भेट एका जाहिरात शूटिंगदरम्यान झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये जवळीक वाढली. ओळखीच रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 रोजी दोघांनी सप्तपदी घेतल्या. अनुष्का आणि विराट या दोघांना अनुष्का ही एकमेव मुलगी आहे.
विराट हे अनुष्काचे पहिलं प्रेम नव्हतं.अनुष्का पहिल्यांजा जीव एका प्रसिद्ध मॉडेलवर जडला होता. झोहेब युसूफ या मॉडेलच्या प्रेमात अनुष्का वेडी झाली होती. अनुष्का झोहेब या दोघांनी मॉडेलिंग करिअरची सुरुवात एकत्र केली. मात्र या दोघांचं रिलेशन फार का टिकलं नाही.
अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचं अनेक जणांसह नाव जोडलं गेलं. यामध्ये रणवीर सिंग याचं नाव आघाडीवर आहे. बँड बाजा बारात या सिनेमात दोघांनी एकत्र काम केल होतं. यानंतर या दोघांमध्ये काही शिजत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या दोघांमध्येही खटके उडाले.
अनुष्का हीचं नाव क्रिकेटर आणि विराटचा सहकारी सुरेश रैना याच्यासोबत जोडलं गेलं होतं. या दोघांची भेट लंडनमध्ये झाली होती. तिथेच अनुष्का सुरेशच्या प्रेमात ठार झाली होती. मात्र दोघेही रिलेशनमध्ये असल्याचं मान्य केलं नव्हतं.
अनुष्का हीचं नाव अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतही जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावर दोघांची खूप चर्चा रंगली होती. इतकंच नाही, तर यानंतर अर्जुन कपूरसोबतही अनुष्काचं काही तरी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं.