
सैराट फेम रिंकू राजगुरुचा चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणारा अंदाज पुन्हा एकदा समोर आला आहे. रिकूने आपल्या इंस्टाग्रामवर किलर लुक देणारे साडी फोरो पोस्ट केले आहेत

गुलाबी रंगाची फुले असलेली ऑफ व्हाइट रंगाची साडी तिने परिधान केली आहे. या साडीत आकर्षक पोझ देत तिने फोटो शूट केलं आहे.

'ख़ूबसूरती न सूरत में है न लिबास में ,निगाहें जिसे चाहे उसे हसीन कर दें' असे कॅप्शन तिने या फोटोना दिले आहे. रिंकूचा सोशल मीडियावरील प्रेझेन्स कमालीचा वाढला आहे. काही दिवसापूर्वी तिने गुलाबी रंगातील साडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झुंड या चित्रपटात रिंकू झळकली होती. या चित्रपटातील तिचा लूक सैराटमधील आर्चीची आठवण करून देणारा असल्याचे अनेकांनी म्हटले होते. झाली. चित्रपटातील तिचा लूकला सोशल मीडियावर प्रचंड व्हायरला झाला होता.

तिने पोस्ट केलेल्या फोटोवरा चाहत्यांनी कमेंटचा वर्षांवर सुरु केला आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही उफ्फ सेक्सी अशी कमेंट या फोटोवर केली आहे.