Rishi Kapoor : ऋषी कपूर यांच्या पाच भूमिकांची झाली होती प्रशंसा, जाणून घ्या त्याबाबत
बॉलिवूडचा अभिनेता ऋषि कपूर याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत रोमँटिक चित्रपट सर्वाधिक केले. मात्र या कारकिर्दीत काही संवेदनशील भूमिकांमुळे त्यांची प्रशंसाही झाली. चला जाणून घेऊयात याबाबत
1 / 6
ऋषि कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपर स्टार होते. रोमँटिक चित्रपटातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दादही दिली. पण या व्यतिरिक्त ऋषि कपूर यांच्या भूमिका चर्चेत राहिल्या आणि त्यांनी एक वेगळी ओळख मिळाली.
2 / 6
मुल्क या चित्रपटात ऋषि कपूर यांनी एक जबरदस्त भूमिका साकारली होती. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाचा तयार झालेल्या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिकेची प्रशंसा झाली. या चित्रपटात तापसी पन्नू आणि आशुतोष राणा हे प्रमुख भूमिकेत होते.
3 / 6
अग्निपथ या चित्रपटात ऋषि कपूर यांनी खलनायकाची भूमिका साकारली. निगेटिव्ह पात्र त्यांनी उत्तमरित्या साकारलं. त्यांची भूमिका रुपेरी पडद्यावर अनेकांना आश्चर्य व्यक्त केलं.
4 / 6
बॉबी चित्रपटातून ऋषि कपूर यांना एक वेगळी ओळख मिळाल. रोमँटिक हिरो म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. त्याच्या चित्रपट कारकिर्दीतील एक प्रमुख भूमिका होती. आजही हा चित्रपट तितकाच आवडीने पाहिला जातो.
5 / 6
102 नॉट आऊट या चित्रपटात ऋषि कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटातील बिग बी आणि ऋषि कपूर यांची भूमिका पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय ऋषी कपूर या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या मुलाच्या रोलमधये दिसले होते.
6 / 6
दिल्ली 6 चित्रपटात ऋषि कपूर साईडेड लव्हरच्या भूमिकेत होते. यात ते रोमांसवर बोलताना दिसले. या चित्रपटात त्यांचा रोल मोठा नव्हता पण जितका होता तितका प्रभावी होता.