चार्लीनं जगाला हसवलं, तरी त्याच्या आयुष्यात दु:खाचा काळोख होता. अत्यंत गरीबीतूनच तो पुढं आला, मात्र त्या गरीबीला आणि गरीबांना तो कधीही विसरला नाही. चार्लीनं त्याच्या मुलीला चेकबूक दिलं होतं,ज्याचा उल्लेख या पत्रामध्येही आहे. त्यात तो पैसे जपून खर्च कर असं सांगतो, शिवाय, 2 नाणी स्वत:वर खर्च केल्यानंतर तिसरं नाणं खर्च करण्याआधी गरजूंचा विचार कर, कदाचित तुझ्यापेक्षा त्या गरजूंना त्या पैशाची जास्त गरज असेल. अशा लोकांना तू सहज ओळखू शकते, त्यांना मदत कर, मी हे सांगतो आहे, कारण पैसारुपी राक्षसाची ताकद मी ओळखतो असं तो पत्रात लिहतो.