अभिनेत्री आणि स्पोर्ट्स अँकर मंदिरा बेदी ही तिच्या कामा सोबतच तिच्या स्टायलिश अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराचा जन्म 1972 मध्ये कोलकातामध्ये झाला.1994 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली.तिने काही काळ टीव्ही अँकर म्हणून काम केलं. दूरदर्शनवरच्या 'शांती' या कार्यक्रमात तिने काम केलं. स्पोर्ट अँकरिंग करणारी मंदिरा पहिली महिला स्पोर्ट्स अँकर ठरली.
'शांती'सोबतच तिने आयसीसी वर्डकपमध्येही चांगल्या प्रकारे काम केलं. तिच्या निवेदनाचं कौतुक झालं पण कौतुकासोबतच तिला ट्रोलही केलं गेलं. जेव्हा मंदिरा होस्टिंगदरम्यान क्रिकेटर्सना प्रश्न विचारायची तेव्हा त्यांना ते आवडायचं नाही.
2007 च्या वर्ल्डकपदरम्यान तिच्यावर टीका झाली ती तिने नेसलेल्या साडीवरून... या वर्ल्डकपदरम्यान तिने नेसलेल्या साडीवर सगळ्याच क्रिकेट टीमचे झेंडे होते. त्यावरून मंदिरावर बरीच टीका झाली होती. त्यानंतर तिने माफीही मागितली होती.
मंदिरा तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते आणि अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. तिच्या फोटोवरूनही तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. मंदिराने 2020 मध्ये तिची मुलगी ताराला दत्तक घेतलं. त्यावेळी तिच्या या निर्णयाचं कौतुक झालं तर काहींनी तिला ट्रोल केलं.
मंदिराने मुंबईतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्राच येण्याचा निर्णय घेतला. 1994 मध्ये तिने डीडी नॅशनलची सर्वात लोकप्रिय मालिका 'शांती' मध्ये काम केलं, ज्यातून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने 'औरत','क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'इंडियन आयडॉल', 'फेम गुरुकुल', 'डील ऑर नो डील' या सारख्या मालिकांमध्येही काम केलं. तिच्या कामाइतकंच तिच्या स्टाईलचीही जोरदार चर्चा होत असते.