5 कलाकार ज्यांनी साकारलेल्या बाप्पाची प्रेक्षकांना भूरळ; पाहा खास फोटो…
Ganesh Chaturthi 2024 Special Story : गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. बाप्पाच्या सेवेसाठी गणेशभक्त सज्ज आहेत. पण स्क्रिनवर गणपती बाप्पाचं पात्र साकारणारे कलाकार कोण? कुणी- कुणी बाप्पा साकारला आहे. मराठी मालिकेतील कलाकाराने वेधलं लक्ष. पाहा खास फोटो...
गणपती बाप्पाImage Credit source: tv9
Follow us
आज गणेश चतुर्थी आहे, आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी बाप्पाची भूमिका साकारली. ‘श्री गणेश’ या मालिकेत जागेश मुकाती यांनी गणपती बाप्पाचं पात्र साकारलं होतं.
‘देवा श्री गणेशा’ या मराठी मालिकेत अद्वैत कुलकर्णी याने गणपती बाप्पाचं पात्र साकारलं होतं. ही मालिका फक्त 11 दिवस चालली होती. मालिकेला टीआरपी नसल्याने लगेचच ही मालिका बंद करण्यात आली होती.
‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका माता पार्वती आणि पुत्र गणेश यांच्या नात्यावर आधारित ही मालिका होती. या मालिकेत स्वराज येवले याने बाप्पाची भूमिका साकारली होती. ही मराठीदेखील प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
‘विघ्नहर्ता गणेश’ ही सोनी टीव्हीवरची मालिकाही लोकप्रिय ठरली होती. यात अभिनेता उजैर बसर आणि निष्कर्ष दीक्षित या दोघांनी गणपतीची भूमिका साकरली होती. 1026 एपिसोड या मालिकेने पूर्ण केले.