गौहरच्या या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक कमेंट्स येत आहेत. गौहरचा जबरदस्त अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. गौहर खान सोशल मीडियावर आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करत असते. गौहर खाननं बिग बॉस 7 हा शो जिंकला होता. शोमध्ये ती आणि कुशल टंडन जवळ आले होते. त्यांचे संबंध काही काळ टिकले, त्यानंतर दोघं वेगळे झाले होते. ब्रेकअपनंतरही त्यांचे चांगले संबंध आहेत. दोघंही आयुष्यात पुढे निघाले आहेत.